spot_img
spot_img
spot_img

नागरिकांना ऑनलाईन सेवा विहीत वेळेत उपलब्ध करुन द्याव्यात-पुणे विभागाचे राज्य आयुक्त सुधाकर तेलंग

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अन्वये नागरिकांना ऑनलाईन सेवा विहीत वेळेमध्ये पारदर्शकपणे उपलब्ध करुन देण्यात याव्यात; या सेवा नागरिकांना घरपोच देण्याबाबत कार्यवाही करावी अशा सूचना राज्य लोकसेवा आयोगाच्या पुणे विभागाचे राज्य आयुक्त सुधाकर तेलंग यांनी दिल्या.

उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी बारामती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हणुमंत पाटील, उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार स्वप्नील रावडे, गट विकास अधिकारी किशोर माने, नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे, आदी उपस्थित होते.

श्री. तेलंग म्हणाले, महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना राज्यशासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवा पारदर्शक, गतिमान व कालबध्द पद्धतीने देण्याकरीता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ पारित करण्यात आला आहे. त्यानुसार या कायद्यान्वये पुरविण्यात येणा-या सर्व सेवा सुविधांची प्रभावी अंमलबजावणी करावी. अधिनियमांच्या अनुषंगाने पारदर्शकता, उत्तरदायित्व, कालबध्द सेवा, कार्यक्षम सेवा, माहिती तंत्रज्ञानाचा वापर व ई-प्रशासन संस्कृतीचा अवलंब करणे याबाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

बारामती तालुक्यामध्ये एकूण १४७ इतके महा ई-सेवा व आपले सरकार सेवा केंद्र आहेत. यापैकी किमान ५ आदर्श आपले सरकार सेवा ग्रामपंचायत व आपले सरकार सेवा केंद्र तयार करावेत. तसेच सर्व महा ई-सेवा व आपले सरकार केंद्रांकरिता सेवा-सुविधाबाबतचे प्रशिक्षण लवकरच आयोजित करणेत येईल, असेही श्री. तेलंग म्हणाले.

श्री. तेलंग यांनी मौजे माळेगाव बु. येथील महा ई-सेवा केंद्राची पाहणी केली. यावेळी तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!