spot_img
spot_img
spot_img
spot_img

क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या पुणे शाखेच्या वतीने आयोजित ऊर्जा संवर्धन स्पर्धा संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी

उद्योगांनी ऊर्जा बचतीसाठी नाविन्यपूर्ण पद्धती स्वीकाराव्यात या उद्देशाने क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया – पुणे शाखेतर्फे ऊर्जा संवर्धन स्पर्धा 2026 यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आली.

ही स्पर्धा हायब्रिड पद्धतीने क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटर भोसरी येथे पार पडली, तर ऑनलाइन सादरीकरणे येत्या 3 जून रोजी आयोजित करण्यात आली आहेत.

या प्रसंगी बोलताना फोरमच्या पुणे शाखेतील प्रतिनिधींनी सांगितले की, या स्पर्धेमुळे केवळ नाविन्यपूर्ण केस स्टडीजना गौरव मिळाला नाही, तर उद्योगांना त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये शाश्वततेचा समावेश करण्यासाठी प्रोत्साहनही मिळाले. सर्जनशील घोषवाक्ये आणि प्रभावी पोस्टर्सच्या माध्यमातून सहभागीांनी हरित भविष्यासाठी ऊर्जा संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले.

यावर्षीच्या कार्यक्रमात 33 संस्थांमधील 235 सहभागी उपस्थित होते. केस स्टडी, घोषवाक्य आणि पोस्टर या विभागांमध्ये एकूण 135 नामांकनांची नोंद झाली. या कार्यक्रमात ऊर्जा बचतीच्या गरजेवर आधारित व्यावहारिक अनुभव, सर्जनशील कल्पना आणि प्रभावी संदेश सादर करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन एनआर इंडस्ट्रीजचे संचालक गौरव सबनीस यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी फोरमच्या पुणे शाखेचे कौन्सिल सदस्य माधव बोरवणकर, परवीन तरफदार, धनंजय वाघोलीकर आणि क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या संचालिका डॉ. रजनी इंदुलकर उपस्थित होत्या .

समारोप समारंभाला स्पार्क मिंडा (डाय कास्टिंग विभाग) चे बिझनेस हेड अजय कुमार, संचालिका डॉ. रजनी इंदुलकर आणि पुणे शाखेचे कौन्सिल सदस्य उपस्थित होते. त्यांनी विजेत्यांना सुवर्ण , रजत व कास्य पुरस्कार मान्यवराच्या हस्ते प्रदान करण्यात आले .

केस स्टडीचे परीक्षण चंद्रशेखर बापट, हनुमंत टिकाटे, वेंकटेश राव आणि प्रशांत मुधाळवाडकर यांनी केले, तर घोषवाक्य आणि पोस्टर स्पर्धेचे परीक्षण परवीन तरफदार आणि धनंजय वाघोलीकर यांनी केले.

कार्यक्रमाचे आयोजन रहीम मिर्झा बेग, प्रशांत बोराटे आणि चंद्रशेखर रुमाले यांनी केले, तर सूत्रसंचालन विजया रुमाले यांनी केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!