spot_img
spot_img
spot_img

२०२७ पासून नीट परीक्षा ऑनलाइन होणार!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी ‘नीट’ (NEET) परीक्षा २०२७ पासून ऑनलाइन होणार आहे. २०२६ च्या परीक्षेत झालेल्या पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून २०२७ पासून नीट परीक्षा पूर्णपणे ‘ऑनलाइन’ (Computer Based Test – CBT) पद्धतीने घेतली जाईल , अशी घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली.

३ मे २०२६ रोजी झालेल्या नीट परीक्षेत झालेल्या गैरप्रकारांमुळे देशभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय (CBI) करत आहे. ऑफलाइन पद्धतीत होणारी पेपरफुटी आणि इतर गैरव्यवहार कायमचे थांबवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे हा पर्याय असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

२०२७ पासून नीट परीक्षा पूर्णपणे ऑनलाइन (CBT) पद्धतीने होणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली. तसेच, २०२६ ची फेरपरीक्षा २१ जून रोजी होणार असून विद्यार्थ्यांना कोणतीही अतिरिक्त फी भरावी लागणार नाही. पेपरफुटी रोखण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

परीक्षा रद्द झाली त्या दिवशी एनटीएनं दोन निर्णय जाहीर केले. झालेल्या परीक्षेची फी विद्यार्थ्यांना परत केली जाईल. पुनर्परीक्षेसाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या परीक्षेची आर्थिक जबाबदारी एनटीए घेईल.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!