spot_img
spot_img
spot_img

ग्लोरिया आयटी पार्कमध्ये मजुरांवर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

बावधन येथील ग्लोरिया आयटी पार्क परिसरात सामान शिफ्टिंगचे काम सुरू असताना चार जणांनी मजुरांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व बांबूने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तिघेजण जखमी झाले असून Bavdhan Police Station येथे चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सचिन पांडूरंग पिटले (वय ३३, रा. लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार लालमतकुमार भोडेला आदिवासी, संजीवकुमार श्रीरामप्रसाद तिवारी, अनुज पवन मिश्रा आणि अनिलकुमार रामप्रकाश मिश्रा या चौघांविरुद्ध बीएनएस कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १३ मे २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बावधनमधील एल.एम.डी चौकातील ग्लोरिया आयटी पार्क येथे फिर्यादी सचिन पिटले हे इतर सहकाऱ्यांसह सामान शिफ्टिंगचे काम करत होते. त्यावेळी आरोपींनी किरकोळ कारणावरून वाद घालत शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर चौघांनी मिळून फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

यावेळी आरोपींनी लाकडी बांबूच्या सहाय्याने सचिन पिटले तसेच सिद्धार्थ सोनवणे आणि अभिषेक फासगे यांच्यावर हल्ला केला. या मारहाणीत तिघांच्या डोक्याला, पाठीला आणि हाताला दुखापत झाली आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार बुलबुल करीत असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!