spot_img
spot_img
spot_img

तडीपार आरोपी देहूरोडमध्ये कोयत्यासह फिरताना जेरबंद

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

देहूरोड परिसरात तडीपार आदेशाचे उल्लंघन करत हातात कोयता घेऊन फिरणाऱ्या एका सराईत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीवर यापूर्वी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश असतानाही तो बेकायदेशीररित्या परिसरात वावरत असल्याचे उघड झाले आहे.

याप्रकरणी Dehu Road Police Station येथे शस्त्र अधिनियम कलम ४(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२, ३७(१)(३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव समीर दिपक डिक्का (वय २३, रा. पारशी चाळ, देहूरोड) असे आहे. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याकडून पुढील चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १४ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.२० वाजण्याच्या सुमारास महात्मा गांधी विद्यालयामागील परिसरात संशयास्पद हालचाली करणारी व्यक्ती फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडे २०० रुपये किंमतीचा केशरी रंगाच्या प्लास्टिक मुठीचा कोयता आढळून आला.

चौकशीत आरोपीविरुद्ध यापूर्वीच मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२, पिंपरी-चिंचवड यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६(१)(ब) अन्वये संपूर्ण पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले असल्याचे निष्पन्न झाले. मात्र संबंधित आरोपीने न्यायालय अथवा वरिष्ठ अधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता तडीपार आदेशाचे उल्लंघन केले.

याशिवाय पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधक आदेशानुसार १३ मे ते २६ मे २०२६ या कालावधीत घातक शस्त्रे बाळगण्यास बंदी असतानाही आरोपी कोयत्यासह फिरताना आढळून आला.

या कारवाईत पोलीस शिपाई मोमीन सुलेमान शेख यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार विधाते करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!