spot_img
spot_img
spot_img
spot_img

निगडीत अंमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई; ४०६ ग्रॅम गांजासह आरोपी अटकेत

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने निगडी परिसरात मोठी कारवाई करत गांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून ४०६ ग्रॅम गांजा, रोख रक्कम असा एकूण २० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणात एका महिलेचे नावही समोर आले आहे.

याप्रकरणी Nigdi Police Station येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), २०(ब)(ii)(अ) आणि २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रकाश तुकाराम शिंगे (वय ३५, व्यवसाय बिगारी काम, रा. संजीव हॉटेल चौक, ओटा स्किम, निगडी) असे आहे. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याकडून अधिक चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १४ मे २०२६ रोजी दुपारी १२.३४ वाजण्याच्या सुमारास निगडी पोलीस स्टेशन हद्दीतील म्हसोबा मंदिराजवळील पायवाट परिसर, दळवीनगर झोपडपट्टी, पत्राशेड निगडी येथे अंमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत होते. त्यावेळी संशयित हालचाली करणाऱ्या आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे ४०६ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला.

पोलिसांनी आरोपीकडून गांजा तसेच रोख रक्कम असा एकूण २०,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चौकशीदरम्यान आरोपीने सदरचा गांजा निगडीतील ओटा स्किम परिसरात राहणाऱ्या सपना साठे नामक महिले कडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. त्यानुसार संबंधित महिलेचाही शोध सुरू करण्यात आला आहे.

ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस शिपाई संतोष बिभीषण सपकाळ यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली असून पुढील तपास पोउपनि पाटील करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!