शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. मार्फत नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, पुणे मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. यांच्या स्वारगेट ते कात्रज बीआरटी मार्गावरील मेट्रो कामकाजामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी काही ठिकाणी पुणे महानगर परिवहन महामंडळ बससेवेच्या मार्गात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
❖ सदर बदल पुढीलप्रमाणे राहतील :-
➢ पंचमी हॉटेल व भापकर पंप परिसर
* स्वारगेटकडून कात्रजकडे जाताना तसेच कात्रजकडून स्वारगेटकडे येताना बसेस बीआरटी मार्गातून संचलनात राहतील.
➢ अरण्येश्वर कॉर्नर व नातूबाग परिसर
* स्वारगेटकडून जाताना तसेच कात्रजकडून येताना बसेसचे संचलन सर्व्हिस रोडने करण्यात येईल.
➢ पद्मावती, के.के. मार्केट, बालाजीनगर, भारती विद्यापीठ, कात्रज सर्पोद्यान व मोरे बाग परिसर
* स्वारगेटकडून कात्रजकडे जाताना बसेस बीआरटी मार्गातून संचलनात राहतील.
* कात्रजकडून स्वारगेटकडे येताना बसेस सर्व्हिस रोडने संचलनात राहतील.
या बदलाची सदर मार्गांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी नोंद घ्यावी. तसेचप्रवाशांची गैरसोय होऊ नये याकरिता रस्त्याच्या दोन्ही बाजूस नॉन बी. आर. टी.बसस्टॉपची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याची सदर मार्गाने प्रवास करणाऱ्याप्रवाशांनी वरीलप्रमाणे नोंद घ्यावी असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. कडून करण्यात येत आहे.


