spot_img
spot_img
spot_img

गुंतवणुकीवर २० टक्के नफ्याचे आमिष; बावधनमधील व्यावसायिकाची तब्बल २८.२६ लाखांची फसवणूक

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

गुंतवणुकीवर अल्पावधीत मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत बावधन परिसरातील एका नागरिकाची तब्बल २८ लाख २६ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. १५ मार्च २०२६ ते २१ एप्रिल २०२६ दरम्यान बावधन येथील व्हीवा हॉलमार्क, डीएसके रानवारा रोड परिसरात घडली. फिर्यादीला आरोपी महिलांनी संपर्क साधून गुंतवणुकीवर ५ ते २० टक्के नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.

आरोपी टीना म्हलोत्रा आणि सानिका गोखले यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करत विविध योजनांमध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडले. अधिक नफ्याचे आमिष दाखवत त्यांनी वेळोवेळी मोठी रक्कम स्वीकारली. मात्र गुंतवलेली रक्कम परत न करता तसेच कोणताही नफा न देता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी एकूण ₹२८,२६,००० रुपये उकळून फसवणूक केली. या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गु.र.नं. १८३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(सी), ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकरे करीत असून आरोपी महिलांचा शोध सुरू आहे. दरम्यान, गुंतवणुकीवर अवास्तव नफ्याचे आमिष दाखवणाऱ्या व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये, कोणतीही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी संबंधित कंपनी अथवा व्यक्तीची खातरजमा करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!