spot_img
spot_img
spot_img

हिंजवडीत ऑनलाईन गिफ्ट कार्ड फसवणूक; आयटी अभियंत्याच्या क्रेडिट कार्डवरून २ लाखांचा अपहार

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

हिंजवडी आयटी परिसरात सायबर गुन्हेगारांनी पुन्हा एकदा ऑनलाईन फसवणुकीचा डाव साधत एका नागरिकाच्या क्रेडिट कार्डवरून तब्बल २ लाख रुपयांचा अपहार केल्याची घटना समोर आली आहे. बुक माय शो गिफ्ट कार्ड खरेदीच्या नावाखाली हा प्रकार घडल्याने आयटी कर्मचाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. ३ मे २०२६ रोजी दुपारी ४.०५ ते ४.०७ वाजण्याच्या दरम्यान हिंजवडी फेज-३ येथील ईवॉन होम्स, मेगा पोलिस सर्कल परिसरात घडली. फिर्यादी मिलिंद येवले हे आपल्या राहत्या घरी असताना अज्ञात सायबर भामट्यांनी त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डचा गैरवापर केला.

आरोपींनी “बुक माय शो गिफ्ट कार्ड” खरेदीच्या नावाखाली दोन ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केल्याचे समोर आले आहे.

ऑर्डर नंबर : INV 5040460748

ऑर्डर नंबर : INV 5040459255

या व्यवहारांद्वारे फिर्यादी यांच्या क्रेडिट कार्ड क्रमांक ४५०१ ७२०९ ०९४५ २००४ वरून तब्बल ₹२,००,००० रुपये ऑनलाईन वळते करण्यात आले.

विशेष म्हणजे, अवघ्या काही मिनिटांत हे व्यवहार पूर्ण करून सायबर गुन्हेगारांनी फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३१०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१६(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम (सुधारित) २००८ चे कलम ६६(डी) अंतर्गत अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत. दरम्यान, ऑनलाईन व्यवहार करताना कार्डची माहिती, ओटीपी किंवा संशयास्पद लिंक याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!