spot_img
spot_img
spot_img

PUNE : शहरातील बेकायदेशीर पार्क केलेली वाहने हटवा – नगरसेवक सुनील शिंदे

नगरसेवक सुनील शिंदे यांची आयुक्तांकडे बैठक घेण्याची मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

शहरात बेवारस वाहनांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. ही वाहने शहरातील रस्त्यावर बेकायदेशीरपणे उभी असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा येतो. त्यामुळे ही वाहने हटवण्याची मागणी कॉंग्रेस नगरसेवक सुनील शिंदे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.

शिंदे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे कि, वाहनाचे मालक कोण आहेत ? हि वाहने कोणी पार्क केली आहेत ? याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. अश बेकायदेशीर वाहनांमुळे रस्त्यावरची जागा अडविण्यात आली आहे, यामुळे पादचारी व रस्त्यावरून जाणारी वाहने यासाठी कमी जागा उपलब्ध झाल्यामुळे रहदारीला अडथळा येत आहे. परिणामी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होऊन नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

शिंदे यांनी पुढे म्हटले आहे कि, हातगाडी, पथारीवाले बेकायदेशीरपणे उभे राहिले आपण त्यांचेवर कारवाई करत असतो, परंतु या बेकायदेशीर वाहनाबाबत पालिकेकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तरी यासंदर्भात पोलीस आयुक्त, यांचेशी संपर्क साधून व आर. टी. ओ. प्रमुख यांचेशी संपर्क साधून तातडीने सदर बेकायदेशीरपणे रस्त्यावर लावलेली वाहने हटविणेबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा. आवश्यक असल्यास, पोलीस विभाग, अतिक्रमण विभाग, आर. टी. ओ. विभाग यांची बैठक घ्यावी. अशीही मागणी शिंदे यांनी केली आहे.

 

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!