या संदर्भातील अधिकृत माहिती राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पत्राद्वारे आमदार शंकर जगताप यांना दिली आहे.
आमदार शंकर जगताप याबाबत म्हणाले, लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रीयन नागरिकांच्या सोयीसाठी आणि तेथील मराठी समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र मंडळाच्या प्रांगणाची मालकी हक्काची जागा खरेदी करणे अत्यंत आवश्यक होते. यासाठी संस्थेला आर्थिक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी लेखी विनंती डिसेंबर २०२४ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
मराठी भाषेचा परदेशात प्रसार व संवर्धन करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने या मागणीची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली. त्यानुसार मराठी भाषा विभागाच्या अधिनस्त असलेल्या ‘राज्य मराठी विकास संस्थे’मार्फत २५ मार्च २०२६ रोजी तब्बल ५ कोटी रुपयांचा निधी परकीय चलनाद्वारे थेट लंडन महाराष्ट्र मंडळाला वितरित करण्यात आला आहे.
मराठी संस्कृतीच्या जतनाला बळ मिळणार
महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून लंडनमध्ये मराठी सण-उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मराठी भाषेचे वर्ग चालवले जातात. आता हक्काची जागा मिळाल्यामुळे तिथे मराठी संस्कृतीचे संवर्धन अधिक जोमाने करता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. परदेशातील मराठी बांधवांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार शंकर जगताप यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्याचे पिंपरी-चिंचवड आणि लंडनमधील मराठी वर्तुळातून कौतुक होत आहे.
— शंकर जगताप
(आमदार, चिंचवड विधानसभा मतदारसंघ)


