spot_img
spot_img
spot_img

‘शानदार सशक्त नारी पुरस्कार’ सोहळ्यात कर्तृत्ववान महिलांचा होणार सन्मान

झाशीची राणी संघटनेच्या रूपालीताई ठोंबरे पाटील यांच्या हस्ते होणार पुरस्कार वितरण

शबनम न्यूज | प्रतिनिधी

चिंचवड : समाजात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत आदर्श निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यासाठी शबनम न्यूज मीडिया ग्रुप प्रस्तुत ‘शानदार सशक्त नारी पुरस्कार २०२६’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सक्षम महिलांना सन्मानित करण्यात येणार आहे.

या पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे ॲड. रूपालीताई ठोंबरे पाटील यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. त्या पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तसेच झाशीची राणी संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा आहेत. हा भव्य पुरस्कार सोहळा शनिवार, दि. १६ मे २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता तारांगण सभागृह, सायन्स पार्क येथे संपन्न होणार आहे, अशी माहिती शबनम न्यूज मीडिया ग्रुप च्या संचालिका शबनम सय्यद यांनी दिली.

कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून त्यामध्ये नगरसेविका सुलभा ताई उबाळे, नगरसेविका प्रियंका ताई बारसे, सौ. प्रियाताई अण्णा बनसोडे, सौ. किरण ताई हर्षवर्धन भोईर, सौ. सोनाली ताई तुषार हिंगे यांचा समावेश आहे.

या सोहळ्यात केवळ वैयक्तिक पातळीवर कार्य करणाऱ्या महिलांचाच नव्हे, तर समाजात परिवर्तन घडविणाऱ्या सक्षम महिला बचत गटांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे. विविध सामाजिक, राजकीय, पत्रकारिता आणि कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना ‘शानदार सशक्त नारी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे.

पुरस्कारासाठी निवड झालेल्या मान्यवरांमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका दीप्ती अंबरनाथ कांबळे, सामाजिक कार्यकर्ता ऐश्वर्या अमित बाबर , सामाजिक कार्यकर्त्या रेणुका विजय हेगडे, सामाजिक कार्यकर्त्या मेघाली विटकर कुंभार, नगरसेविका अर्चना विनोद तापकीर , नगरसेविका अरुणा गणेश लंगोटे , सामाजिक कार्यकर्त्या मालिका नितीन साकळे, सामाजिक कार्यकर्त्या शितल संतोष शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या रूपाली सचिन वाल्हेकर, सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा आनंद दौंड व पत्रकार तसेच कलाक्षेत्रातून अमृता बाजीराव ओंबाळे यांचा समावेश आहे.

महिलांच्या कार्याचा गौरव करून समाजात सकारात्मक प्रेरणा निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा पुरस्कार सोहळा सामाजिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना आयोजकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!