नगरसेवक प्रशांत जगताप, रत्नप्रभा जगताप यांच्या प्रयत्नातून भव्य ध्वजस्तंभाचे लोकार्पण
शबनम न्यूज | प्रतिनिधी
वानवडी साळुंखे विहार प्रभाग म्हणजे सर्व जाती, सर्व धर्म, सर्व पंथांच्या नागरिकांचे वास्तव असलेला, एका बाजूला राज्य राखीव पोलीस बलाचे २ गट व एका बाजूला भारतीय सैन्य दलाची छावणी असलेला भाग. खऱ्या अर्थाने भारत देशाचे प्रतिबिंब आपल्या या वानवडी साळुंखे विहार प्रभागात उमटले आहे. म्हणूनच प्रभागात भारताचा राष्ट्रध्वज उंच फडकावा, आपल्या प्रभागात भव्य ध्वजस्तंभ असावा अशी माझी प्रदीर्घ इच्छा होती. तमाम पुणेकरांच्या आशीर्वादाने मी व माझ्या मातोश्री सौ. रत्नप्रभाताई जगताप यांच्या प्रयत्नाने नगरसेवक पदाच्या मागील कार्यकाळात संविधान चौकात ४५ मीटर उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला. आज काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या शुभहस्ते ध्वजस्तंभाचे लोकार्पण संपन्न झाले.
अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण होताना, वानवडी साळुंखे विहार प्रभागात भारताचा राष्ट्रध्वज ४५ मीटर उंचीवर पडताना पाहणे हा माझ्या जीवनातील सर्वात अभिमानाचा व आनंदाचा क्षण ठरला.
यावेळी पुणे शहराचे उपमहापौर परशुराम वाडेकर, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, काँग्रेसचे कोषाध्यक्ष अभय छाजेड, ज्येष्ठ नेते मोहन जोशी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, गटनेते चंदूशेठ कदम, नगरसेवक साहिल केदारी, शिवाजीराव केदारी, नानासाहेब जगताप, दीप्तीताई चौधरी, विशाल मलके, रफिक शेख, सुनील शिंदे, मोहसीन शेख, काशीफ सय्यद, मजहर मणियार यांच्यासह इतर मान्यवर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




