spot_img
spot_img
spot_img

देहूरोडमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई; २४२ ग्रॅम गांजासह एक जण अटकेत

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

देहूरोड परिसरात अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत गुन्हे शाखेच्या पथकाने एका व्यक्तीस गांजासह रंगेहात पकडले आहे. या कारवाईत सुमारे २२ हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका महिलेलाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३५ वाजण्याच्या सुमारास आंबेडकर नगरकडून शितळानगरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत, हॉटेल महाराष्ट्र समोर फुटपाथवर संशयित हालचाली करत असताना आरोपी अनिल जगन्नाथ बोरसे (वय ४२, रा. देहुरोड, पुणे) यास अंमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेतले.

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २४२ ग्रॅम गांजा (किंमत अंदाजे १२,१०० रुपये) आढळून आला. तसेच एक मोबाईल हँडसेट, वजनकाटा आणि पारदर्शक प्लास्टिकच्या पिशव्या असा एकूण सुमारे २२,३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा गांजा विक्रीसाठी बेकायदेशीररित्या बाळगल्याचे निष्पन्न झाले आहे.

प्राथमिक चौकशीत आरोपी बोरसे याने हा गांजा एका महिले कडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिल्याने संबंधित महिलेलाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.

या प्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११२/२०२६ नुसार एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क), २०(ब)(ii)(अ) व २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अनिल बोरसे याला अटक करण्यात आली असून दुसऱ्या आरोपी महिलेचा शोध सुरू आहे.

या कारवाईचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डोंगळे करीत असून, शहरात वाढत्या अंमली पदार्थांच्या विक्रीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोहीम अधिक तीव्र केल्याचे दिसून येत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!