spot_img
spot_img
spot_img

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून ७.४५ लाखांची फसवणूक; रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर पदावर नोकरी लावण्याचे आश्वासन; आरोपी महिला फरार

प्रतिनिधी – युनूस खतीब | पिंपरी-चिंचवड

रावेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तब्बल ७ लाख ४५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपी खुशी वसंतराव देशमुख (रा. शिव नगरी, मंदिराजवळ, बिजली नगर, चिंचवड, ता. हवेली, जि. पुणे) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. १५ जुलै २०२१ ते १६ जुलै २०२५ दरम्यान किवळे परिसरात घडली. आरोपीने फिर्यादी महिलेस तसेच तिची मैत्रीण तृप्ती निलेश दैठनकर यांना येरवडा येथील जेल विभागात ज्युनिअर क्लार्क आणि सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर पदावर सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. यासाठी वेळोवेळी मोठ्या रकमेची मागणी करत आरोपीने एकूण ७,४५,५०० रुपये उकळले.

नोकरी लावून देण्याचे आश्वासन पूर्ण न झाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी महिलेने तक्रार दाखल केली. त्यानुसार रावेत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) व ३१६ (२) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा गुन्हा दि. ३ मे २०२६ रोजी दुपारी ३.०३ वाजता दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक टार्फे करीत आहेत. आरोपीचा शोध सुरू असून लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!