spot_img
spot_img
spot_img

हिंजवडीत कोयत्याने हल्ला; किरकोळ वादातून तरुण जखमी, आरोपी अटकेत

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी – युनूस खतीब

हिंजवडी परिसरात किरकोळ वादातून कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली असून यात एक जण जखमी झाला आहे. लक्ष्मी चौक येथील देशी दारू दुकानासमोर २७ एप्रिल रोजी रात्री सुमारे ८.४५ वाजता हा प्रकार घडला.

या प्रकरणी अनिल बाळासाहेब ठोंबरे (वय २८, सेल्समन, रा. हिंजवडी) यांनी फिर्याद दिली असून हिंजवडी पोलिसांनी सुरज राजू धोगडे (वय १८, रा. वाकड) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दुकानात येऊन भांडण करत होता. त्यावेळी फिर्यादी यांनी त्याला समज देत बाहेर काढले. याचा राग मनात धरून आरोपीने शिवीगाळ करत ऊस तोडण्याच्या कोयत्याने फिर्यादीच्या हातावर वार करून त्याला जखमी केले.

या घटनेप्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ताकतोडे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!