spot_img
spot_img
spot_img

चिंचवडमध्ये अल्पवयीनाकडून पिस्तूल जप्त; शस्त्र पुरवठादारावरही गुन्हा

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी – युनूस खतीब

चिंचवड परिसरात एका अल्पवयीन मुलाकडून देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केल्याची घटना उघडकीस आली आहे. म्हसोबा मंदिराच्या मागील मोकळ्या जागेत २७ एप्रिल रोजी रात्री सुमारे १०.३० वाजता ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस कर्मचारी अविनाश गायकवाड यांनी फिर्याद दिली असून एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्याला शस्त्र पुरवठा करणाऱ्या रामसिंग (रा. सेंधवा, मध्य प्रदेश) याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलाकडे सुमारे ५५ हजार रुपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे विनापरवाना आढळून आले. तसेच आयुक्तालयाच्या हद्दीत लागू असलेल्या शस्त्रबंदी आदेशाचा भंग केल्याचेही समोर आले. चौकशीत ही शस्त्रे आरोपी रामसिंग याच्याकडून मिळाल्याचे निष्पन्न झाले आहे.

या घटनेप्रकरणी भारतीय न्याय संहिता, हत्यार प्रतिबंध अधिनियम व महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक झिंजुर्डे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!