spot_img
spot_img
spot_img

घोरपडे पेठेत बालविवाह रोखला; खडक पोलिसांची तातडीची कारवाई

अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्याचा प्रयत्न उधळला, संबंधितांना घेतले ताब्यात

पुणे | प्रतिनिधी

पुण्यातील घोरपडे पेठ परिसरात अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देण्याचा प्रयत्न खडक पोलिसांनी हाणून पाडला. संबंधित मुलगी १८ वर्षे पूर्ण होण्यासाठी अजून तीन महिने बाकी असल्याची माहिती समोर आली असून, पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करत विवाह सोहळा थांबवला.

मिळालेल्या माहितीनुसार, घोरपडे पेठ येथील जोहरा कॉम्प्लेक्सजवळ हा कार्यक्रम सुरू होणार होता. याबाबत माहिती मिळताच खडक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मुलीच्या कुटुंबीयांसह संबंधितांना ताब्यात घेतले.

या कारवाईदरम्यान काही कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा परिसरात होती. मात्र, पोलिसांनी कायद्यापुढे कुणीही मोठे नसल्याचे स्पष्ट करत ठाम भूमिका घेत कारवाई सुरू ठेवली.

बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार मुलीचे किमान वैधानिक लग्नाचे वय १८ वर्षे असून, त्यापूर्वी विवाह लावणे हा दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळे या प्रकरणात संबंधितांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.

खडक पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे संभाव्य बालविवाह रोखण्यात यश आले असून, परिसरात पोलिसांच्या भूमिकेचे कौतुक होत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!