spot_img
spot_img
spot_img

तडीपार आरोपीकडून देशी पिस्तूल जप्त; बावधन पोलिसांची कारवाई

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

बावधन परिसरात तडीपार आदेशाचे उल्लंघन करून विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल रोजी दुपारी मुकाईवस्ती, बावधन येथे आरोपी राहुल सुरेश गोणते (वय २४) हा संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. झडती घेतली असता त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले.

तपासात आरोपीवर यापूर्वी तडीपार आदेश लागू असल्याचे निष्पन्न झाले. तसेच शहरात लागू असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचेही त्याने उल्लंघन केले होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!