spot_img
spot_img
spot_img

नगरसेविका डॉ. कुंदाताई भिसे यांच्या पाठपुराव्याला यश ; पिंपळे सौदागरमधील ‘पब्लिक सायकल शेअरिंग’ सेवा सुरू!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनशैलीला चालना देण्यासाठी ८ एप्रिल रोजी सुरू करण्यात आलेल्या ‘पब्लिक सायकल शेअरिंग’ या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. मोठ्या संख्येने नागरिकांनी सकाळच्या व्यायामासाठी व फिटनेससाठी मंथली सबस्क्रिप्शन घेतले.
मात्र, उपक्रम सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच सायकल स्टँड वेळेवर उघडला जात नसल्याच्या तक्रारी समोर आल्या. सकाळी लवकर सायकल राईडसाठी येणाऱ्या नागरिकांना साडेसात वाजेपर्यंत ताटकळत थांबावे लागत होते. त्यामुळे नागरिकांच्या उत्साहावर पाणी फिरत होते आणि या चांगल्या उपक्रमाबद्दल नाराजी वाढत होती.

या समस्येची गांभीर्याने दखल घेत सामाजिक कार्यकर्त्या कु. संजीवनी पुराणिक यांनी तात्काळ नगरसेविका डॉ. कुंदाताई भिसे तसेच चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार माननीय शंकरभाऊ जगताप यांच्याकडे तक्रार नोंदवली.

कुंदाताईंचा ठोस पाठपुरावा ; सर्व मान्यवरांच्या समन्वयातून तात्काळ निर्णय

नगरसेविका डॉ. कुंदाताई भिसे यांनी आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे आणि नगरसेविका अनिताताई काटे यांच्या सहकार्याने संबंधित प्रशासनाशी समन्वय साधत ही समस्या तातडीने सोडवली. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सायकल सेवा वेळेत मोठा बदल करण्यात आला.

आता ‘पब्लिक सायकल शेअरिंग’ सेवा आठवड्याच्या सर्व दिवसांसाठी दररोज सकाळी ६:०० ते रात्री ८:०० या वेळेत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सकाळी व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणतीही अडचण येणार नाही.

याचबरोबर, सायकल स्टँड वेळेवर सुरू ठेवणे आणि सायकलींचे नियमित मेंटेनन्स याबाबत संबंधित यंत्रणेला स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

या संदर्भात बोलताना नगरसेविका डॉ. कुंदाताई भिसे यांनी सांगितले की, “पिंपळे सौदागरमधील नागरिकांच्या आरोग्यासाठी सुरू केलेल्या या उपक्रमात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नागरिकांना सकाळी व्यायामासाठी अडथळा येत असल्याचे लक्षात येताच तात्काळ उपाययोजना केल्या. पुढेही अशा सेवा अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.”

सुधारित वेळापत्रकामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेकांनी डॉ. कुंदाताई भिसे, शत्रुघ्न बापू काटे, अनिताताई काटे आणि आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या तत्परतेचे व प्रभावी समन्वयाचे कौतुक केले आहे.

पिंपळे सौदागर परिसरात आरोग्यदायी उपक्रमांना चालना देत नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवण्याची कार्यपद्धती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!