spot_img
spot_img
spot_img

ओम प्रतिष्ठानच्या विद्यादान योजनेचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात साजरा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

ओम प्रतिष्ठान संस्थेच्या, विद्यादान योजनेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त ग.दी. माडगूळकर नाट्यगृह येथे सायंकाळी पाच वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते तीन मुलीना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्नेहवन संस्थेचे संस्थापक मा. अशोक देशमाने होते. तसेच पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त मा. रवी पवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याशिवाय टीसीएस कंपनीच्या सीओई प्रिती नारायण तसेच रोटेरियन शकुंतला बंसल यांसह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थित होते.

यावेळी सर्व मान्यवरांनी ओम प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करत विद्यादान योजनेला शुभेच्छा दिल्या. मा. महापौर रवी लांडगे साहेब यांनी संस्थेच्या या कार्याचे कौतुक करताना सांगितले की समाजाप्रती असलेल देणं या मुलींच्या उच्च शिक्षणाच्या माध्यमातून पूर्ण होताना पाहून समाधान व्यक्त केले. व या कार्यात मदत करणाऱ्या समाजाचे कौतुक केले. तसेच या प्रसंगी पालिकेच्या वतीने आवश्यक ती मदत करण्यास सदैव तयार असल्याचे आश्वासनही देण्यात आले.

समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देताना त्यांच्या स्वप्नांना पंखाचे बळ देणे हे अत्यंत महत्त्वाचे कार्य असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून ओम प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याची आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाची पुन्हा एकदा दखल घेण्यात आली.

ओम प्रतिष्ठान विद्यादान योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्नेहवन संस्थेचे संस्थापक मा. अशोक देशमाने यांनी देखील सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली.

ओम प्रतिष्ठानच्या माध्यमातून ज्या मुलींच्या वडिलांचे निधन झाले आहे, अशा मुलींच्या कुटुंबातील लहान किंवा मोठ्या भावांच्या शिक्षणाची जबाबदारी स्नेहवन संस्थेतर्फे स्वीकारली जाईल, असे त्यांनी या प्रसंगी आवर्जून सांगितले.

पुणे महानगरपालिकेचे उपआयुक्त मा. रवी पवार साहेब यांनी मुलींच्या शिक्षणासाठी वैयक्तिक रित्या कोणत्याही प्रकारची मदत करण्यास तयारी दर्शविली.

यावेळी त्यांनी मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत, समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मुलींचे शिक्षण अत्यंत गरजेचे असल्याचे नमूद केले. तसेच ओम प्रतिष्ठान तळागाळातील मुलींना शिक्षणासाठी मदत करत असल्याबद्दल त्यांच्या कार्याचे विशेष कौतुकही केले.

टीसीऐस कंपनीच्या सीओई सौ. प्रीती नारायण यांनी या कार्याची दखल घेत सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले. तसेच रोटेरियन शकुंतला बन्सल यांनी या कार्याला शुभेच्छा दिल्या.तसेच या सामाजिक सहकार्याच्या योगदानामुळे उपस्थितांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

संस्थेच्या अध्यक्षा वनिता सावंत यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!