spot_img
spot_img
spot_img

बनावट कागदपत्रांवर 7.50 कोटींचे कर्ज उचलल्याचा आरोप; निगडीत चार जणांवर गुन्हा

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

निगडी परिसरातील सुवर्णयुग सहकारी बँकेची तब्बल 7 कोटी 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमआयडीसीच्या मालकीच्या भूखंडाची बनावट कागदपत्रे सादर करून कर्ज मंजूर करून घेतल्याप्रकरणी चार जणांविरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार दि. 25 जुलै 2014 पासून ते आजपर्यंत सुवर्णयुग सहकारी बँक, निगडी शाखा, गणेश व्हिजन, आकुर्डी येथे घडला.

या प्रकरणी शिरीन रऊफ शेख (वय 54), क्षेत्र व्यवस्थापक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, आरोपी हे मे. मॅसकॉर्प कंपनीचे तत्कालीन संचालक असून त्यांनी साथीदारांच्या मदतीने एमआयडीसीच्या मालकीचा भूखंड क्रमांक 4 डी 3 ब्लॉक, पिंपरी इंडस्ट्रियल एरिया, मुंबई-पुणे रोड, चिंचवड या सुमारे 1864 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या मिळकतीची बनावट कागदपत्रे तयार केली.

यानंतर त्या बनावट कागदपत्रांच्या आधारे सुवर्णयुग सहकारी बँकेकडून 7 कोटी 50 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. तसेच कर्जाचा बोजा नोंदविण्यासाठीही एमआयडीसीची बनावट कागदपत्रे वापरल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी खालील आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे :

अॅलेन अरुण बनसोडे (वय 47)

सोनिया अरुण बनसोडे (वय 48)

सोलोमन अॅलेन बनसोडे (वय 29)

सेवारा बुरखानोबा (वय 35)
(सर्व रा. चिंचवड)

निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 245/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 338, 336(3), 340(2), 3(5), 61(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि आ.गु.शा. कलगुटगे करीत आहेत. आर्थिक गुन्ह्यांच्या या प्रकारामुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!