शबनम न्यूज | प्रतिनिधी
राळेगणसिद्धी येथे आंतरराष्ट्रीय पर्यावरण बहुद्देशीय संस्थेच्या आठव्या उन्हाळी अधिवेशनानिमित्त भव्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात समाजकार्य आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
या वेळी दिल्ली येथील तिहार जेलचे माजी जेलर अजयजी भाटिया तसेच पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या हस्ते श्रीमती अंजू सोनवणे यांना त्यांच्या समाजाप्रती केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल “राष्ट्रीय समाज भूषण” व “आदर्श शिक्षक” पुरस्काराने गौरविण्यात आले.
तसेच श्रीमती मनीषा कलशेट्टी, श्रीमती अनघा दिवाकर, शोभा देवकाते आणि श्री सुभाष देवकाते यांना “आदर्श शिक्षक” व “सेवा रत्न” पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक आणि समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या व्यक्तींना अशा प्रकारे गौरविणे प्रेरणादायी ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.





