पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
मावळ तालुक्यातील पाथरगाव परिसरात तब्बल १३ फूट लांबीचा अजगर आढळल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच वाईल्डलाईफ रॅपिड रिस्पॉन्स युनिट मावळ, वडगाव मावळ वन विभाग आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांनी संयुक्तपणे धडक रेस्क्यू मोहीम राबवत अजगराला सुरक्षितरीत्या पकडले.
या थरारक कारवाईत विशाल केदारी, अविनाश केदारी, दिनेश केदारी, नवनाथ केदारी, अजित नाणेकर आणि केतिका कसेतवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अजगर पकडल्यानंतर जिगर सोलंकी, रौनक खरे आणि वनरक्षक महोरे यांनी त्याची प्राथमिक आरोग्य तपासणी केली.
वनपरिक्षेत्र अधिकारी Prakash Shinde आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक Nilesh Garade यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तपासणीनंतर अजगराला कोणतीही इजा नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मानवी वस्तीपासून दूर नैसर्गिक अधिवासात त्याची सुरक्षित मुक्तता करण्यात आली.
वन्यजीव अभ्यासक Jigar Solanki यांनी सांगितले की, भारतीय अजगर हा बिनविषारी साप असून तो अत्यंत संथ स्वभावाचा असतो. माणसावर हल्ला करण्याची शक्यता अत्यल्प असते. मात्र, शिकार शोधताना तो शेत किंवा घराजवळ येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी शेतात काम करताना व रात्रीच्या वेळी घराबाहेर जाताना सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.




Total Users : 239624