spot_img
spot_img
spot_img

हिंजवडीत सार्वजनिक रस्त्यावर गावठी पिस्टलसह एक जेरबंद

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

हिंजवडी परिसरात सार्वजनिक रस्त्यावर विनापरवाना गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई १९ एप्रिल रोजी सायंकाळी ७.२० वाजण्याच्या सुमारास पद्मभूषण चौक ते शिंदेवस्ती मारुंजी रोडवरील Falo Hotel समोर करण्यात आली.

याप्रकरणी पोलीस शिपाई अजित अरविंद शिंदे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राकेश वासुदेव येवले (वय ३४, रा. कान्हेवाडी तर्फे चाकण, ता. मावळ, जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी संशयिताची झडती घेतली असता त्याच्याकडून ३५ हजार रुपये किमतीचे लोखंडी बनावटीचे गावठी पिस्टल आणि एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस आढळून आले. आरोपीकडे कोणताही वैध परवाना नसल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले.

हिंजवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!