spot_img
spot_img
spot_img

काळेवाडीत गुंडा विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह तरुण अटकेत

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

काळेवाडी परिसरात गुंडा विरोधी पथकाने सापळा रचून गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तरुणाला अटक केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई १८ एप्रिल रोजी रात्री ८.४१ वाजण्याच्या सुमारास तापकीर मळा येथील बेबी स्कूलजवळ, राज तापकीर यांच्या मोकळ्या जागेत करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अंमलदार शुभम तानाजी कदम यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार आशिष एकनाथ शेटे (वय २६, रा. श्रीकृष्ण कॉलनी, गोडांबे चौक, रहाटणी) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिस आयुक्तांनी लागू केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून आरोपी स्वतःजवळ एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे बाळगत असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

कारवाईदरम्यान सुमारे ५० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्टल आणि दोन हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. काळेवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!