spot_img
spot_img
spot_img

यात्रेतील गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची पोत लंपास; दोघे जेरबंद

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

थेरगाव येथील बापुजीबुवा मंदिर परिसरात यात्रेतील गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरी करणाऱ्या दोन आरोपींना काळेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे यात्रास्थळी काही काळ खळबळ उडाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १८ एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास बापुजीबुवा मंदिर परिसर, थेरगाव येथे घडली. याप्रकरणी नागिनी सिद्धेश्वर तांभाळे (वय ४०, रा. दगडू पाटील नगर, थेरगाव) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार सुरज सुरेश खाडे (वय २७, रा. मुंजेवाडी, अहमदनगर) आणि रावसाहेब साहेबराव जाधव (वय ५०, रा. गणेगाव, भूम, जि. धाराशिव) यांना अटक करण्यात आली आहे.

दोन्ही आरोपींनी संगनमत करून यात्रेतील गर्दीचा फायदा घेत फिर्यादीची पर्स कापली. त्यानंतर पर्समधील गळ्यातील सुमारे २५ हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची काळ्या मण्यांची पोत चोरून नेल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

काळेवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!