spot_img
spot_img
spot_img

उर्से टोलनाक्यावर तरुणाचे अपहरण करून मारहाण; पाच जण अटकेत

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

मावळ तालुक्यातील उर्से टोलनाका परिसरात तरुणाला बेदम मारहाण करून जबरदस्तीने गाडीत टाकून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरगाव पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ एप्रिल रोजी पहाटे दोन ते सकाळी साडेअकराच्या दरम्यान उर्से गाव हद्दीतील उर्से टोलनाका येथे ही घटना घडली. महिला फिर्यादी यांचा भाऊ लतिकेश दांगट हा तेथे बॅनर लावण्यासाठी गेला होता.

त्यावेळी आरोपी तेथे आले आणि “माझ्या बहिणीसोबत का बोलतोस?” असा जाब विचारत वाद घातला. त्यानंतर मुख्य आरोपी कृष्णा चंद्रभान चव्हाण याने लाकडी दांडक्याने हातावर व पाठीवर मारहाण केली. इतर आरोपींनीही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

मारहाणीनंतर जखमी तरुणाला जबरदस्तीने गाडीत टाकून आरोपींनी तेथून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १३७(२), ११८(१), ११५(२), १२७(२), ३५२, १८९(१), १८९(२), १९०, १९१(१), १९१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कृष्णा चंद्रभान चव्हाण (वय २१) याच्यासह आदेश कारके, साहील गायकवाड, मेघराज राऊत आणि कृष्णा साधु यांचा समावेश आहे. एका विधिसंघर्षित बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पारखे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!