शबनम न्यूज | प्रतिनिधी
६ एप्रिल भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस त्यानिमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरामध्ये भाजपा प्रदेशाच्या सूचनेनुसार व भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या नेतृत्वाने व आमदार शंकर भाऊ जगताप,महेश दादा लांडगे, उमाताई खापरे ,अमित जी गोरखे व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाने पिंपरी चिंचवड शहरात विविध उपक्रम समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आले.
पक्षाच्या वतीने एक शहर समिती स्थापन करून त्यांच्या माध्यमातून ५ एप्रिल ते १८ एप्रिल या कालावधीत विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आले या समितीचे शहर संयोजक म्हणून भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महामंत्री मधुकर बच्चे यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये भारतीय जनता पार्टी शहर जनसंपर्क कार्यालयाची सजावट व ज्येष्ठांच्या हस्ते भाजपाचा ध्वज फडकावून जल्लोष करीत भारतीय जनता पार्टीत ज्येष्ठ असलेल्यांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर शहरातील भारतीय जनता पार्टीच्या माजी खासदार, माजी आमदार, व आत्ताचे सर्व आमदार, नगरसेवक व सर्व पदाधिकाऱ्यांची शहरात असलेली जनसंपर्क कार्यालय सजावट व विद्युत रोषणाई, फुलांची विविध आकर्षक सजावट, करून भाजपचा ध्वज फडकावून परिसरातील जनतेला सामील करून मिठाईवाटप असेल जल्लोष असेल विविध उपक्रम स्वच्छता अभियान ,फळे वाटप ,आरोग्य शिबिरे ,गरजूंना शालेय वस्तू वाटप, रक्तदान शिबिरे , सांस्कृतिक मनोरंजन कार्यक्रम असे अनेक विविध समाज उपयोगी उपक्रम संपूर्ण शहरभर राबविण्यात आले.
या सप्ताहात शेवटच्या टप्प्यातील उपक्रम म्हणजे गाव चलो अभियान म्हणजेच नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना केंद्र सरकार राज्य सरकार महानगरपालिका यांनी आणलेल्या प्रभावी योजना सांगणे व संपर्क करणे तसेच प्रभागात प्रत्येक बुथवर म्हणजेच भिंतीवर भारतीय जनता पार्टीचे कमळ काढणे, भारतीय जनता पार्टीतील ज्येष्ठांचा सन्मान तसेच भारतीय जनता पार्टी साठी योगदान असणाऱ्या मान्यवरांचा सन्मान, विविध क्षेत्रातील भरीव कामगिरी करणारे परिसरातील जनतेचा विशेष सन्मान असे उपक्रम राबविण्यात आले.
भाजपा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या मार्गदर्शनाने या अभियानाचे या स्थापनादिन सप्ताहाचे पिंपरी चिंचवड शहर संयोजक ,भाजपा महामंत्री मधुकर बच्चे यांनी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हे अभियान अत्यंत यशस्वीपणे पार पाडले यामध्ये मा. खासदार सर्व आमदार, सर्व जिल्हा महामंत्री,माजी प्रदेश पदाधिकारी, सर्व मंडल अध्यक्ष जिल्हा पदाधिकारी, महिला मोर्चा, युवा मोर्चा सर्व आघाड्या शक्ती प्रमुख बुथ प्रमुख, कार्यकर्ते, आदींनी यात यशस्वीपणे सहभाग घेतला




