spot_img
spot_img
spot_img

व्हिडिओ व्हायरलची धमकी देत ट्रॅफिक पोलिसाकडून ५० हजारांची खंडणी मागणी; मुख्य आरोपी अटकेत

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

वाकड परिसरात ट्रॅफिक पोलिसाला धमकावून खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती दाखवत तब्बल ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी वाकड पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. १५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास भुजबळ चौक येथील वाकड वाहतूक शाखेत घडली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र निवृत्ती बारामते (वय ३१) यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपी वरद मनोज चव्हाण (रा. संभाजीनगर) याने आपल्या दोन साथीदारांसह संगनमत करून हा गुन्हा केल्याचे तपासात समोर आले आहे. इतर आरोपींमध्ये विश्वजीत आणि अर्थव क्षीरसागर (दोघेही अंदाजे १९ वर्षे) यांचा समावेश असून त्यांचा शोध सुरू आहे.

तपासादरम्यान उघड झाले की, दि. १४ एप्रिल रोजी वाकड येथे वाहन तपासणीदरम्यान आरोपी चव्हाण याच्याकडून दंडाची रक्कम घेतानाचा व्हिडिओ काढण्यात आला होता. त्याच व्हिडिओचा गैरफायदा घेत आरोपींनी तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.

“हा व्हिडिओ व्हायरल करायचा नसेल तर ५० हजार रुपये द्या, तसेच गाडीवरील १३ हजार रुपयांचा दंड भरा,” अशी मागणी करत आरोपींनी फिर्यादी पोलिसाला धमकावले. या प्रकारामुळे पोलीस दलातही खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (२), ३ (५) तसेच भा.द.वि. कलम ३८४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी वरद चव्हाण याला अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!