spot_img
spot_img
spot_img

अमेझॉन गेटसमोरून तरुणाचे अपहरण; ६ जणांना अटक, जुना वाद ठरला कारण

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

खेड तालुक्यातील वासुली परिसरात अमेझॉन कंपनीच्या गेटसमोरून एका तरुणाचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८७/२०२६ दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ६ आरोपींना अटक केली आहे. एका विधीसंघर्षित बालकाचाही यात समावेश आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी समर्थ उर्फ सोन्या माणिक तावरे (वय १८, रा. खालुंब्रे, ता. खेड) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.

आरोपींमध्ये सागर बाळू जावळे, नितीन संजय थिटे, सौरभ उर्फ सोन्या अनिल ढोरे, अजय भरत गोपाळे, कुणाल प्रशांत चव्हाण आणि ओमकार दशरथ कोरडे यांचा समावेश असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

तपशीलानुसार, आरोपी लाल रंगाच्या थार व पांढऱ्या रंगाच्या नेक्सॉन कारमधून एकत्र आले. ऋषीकेश दिलीप कल्हाटकर आणि सागर जावळे यांच्यातील जुन्या वादातून त्यांनी वीकेश दिलीप कल्हाटकर (वय २६, रा. कोरेगाव बु., ता. खेड) याचे जबरदस्तीने अपहरण केले. त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने थार गाडीत बसवून पळवून नेण्यात आले.

या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत अपहरण केलेल्या तरुणाचा शोध घेत त्याची सुखरूप सुटका केली.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १४०(१), ३५१(४), ३(५), १८९(२), १९० व १९१(२) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घाडगे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!