पिंपरी-चिंचवड ( प्रतिनिधी युनूस खतीब )
भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
यावेळी पिंपरी येथील भीमसृष्टी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. सामाजिक समता, बंधुता आणि संविधानिक मूल्ये यांचा संदेश समाजात रुजविण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास मुस्लिम समाजातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये शहाबुद्दीन शेख, हाजी सय्यद गुलाम रसूल, रूहिनाज शेख, कमरुनिसा शेख, हाफिज मोईन, व्ही. एम. कबीर शेख, साजिद खान, सालार शेख, मौलाना ऐसान खान, शाफिल्ला चौधरी, फिरोज तांबोळी, करीम पुना, सुलतान तांबोळी, जावेद जागीरदार, मोईन पुना आदींचा समावेश होता.
उपस्थितांनी आपल्या मनोगतातून डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक अधिकारांचे महत्त्व अधोरेखित करत सर्व समाजांनी एकत्र येऊन देशाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच सामाजिक ऐक्य आणि बंधुभाव जपण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला.




Total Users : 239650