spot_img
spot_img
spot_img

साऊंड, डीजे खर्च टाळून, गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना तब्बल पाच लाख रुपयांची शिष्यवृत्ती; नगरसेवक तुषार हिंगे यांचा स्तुत्य उपक्रम

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण हे वाघीनीचे दूध आहे त्यामुळे  शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र समाजाला दिला. उद्या १४ एप्रिल २०२६ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून, त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने शहराचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक तुषार रघुनाथ हिंगे व आरंभ सोशल फाउंडेशन यांच्या माध्यमातून दरवर्षी साउंड व होणार इतर खर्च टाळून पिंपरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक १० मधील लालटोपीनगर मोरवाडी, विद्यानगर, इंदिरानगर, दत्त नगर, परशुराम नगर, शंकरनगर व  अण्णासाहेब नगर वसाहतीतील गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून तब्बल पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

दहावी तसेच बारावीच्या परीक्षेत पंचाहत्तर टक्क्यांहून ( ७५ % )अधिक गुण मिळविणारे गरजू विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा फायदा घेता येणार आहे. आरंभ फाउंडेशनच्या वतीने प्रतिवर्षी यशस्वी भव ! या उपक्रमाद्वारे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप गेली अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. “प्रभाग क्रमांक १० मधील लालटोपीनगर मोरवाडी, विद्यानगर, इंदिरानगर, दत्त नगर, परशुराम नगर, शंकरनगर व अण्णासाहेब नगर या वसाहतींमध्ये अनेक होतकरू कुटुंब राहतात, त्यांच्या गुणवंत मुलांची शैक्षणिक जडणघडण करण्यासाठी या शिष्यवृत्तीच्या मार्फत होणारी हि मदत नक्कीच त्यांच्या खर्चाला हातभार लावणारी असणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्व समाजाला वेळोवेळी समजावून सांगितले असून त्यांच्या प्रेरणेतूनच अनावश्यक खर्च टाळून हा उपक्रम दरवर्षी सुरु ठेवणार असल्याचे आरंभ सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, पिंपरी चिंचवड शहराचे मा.उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक तुषार रघुनाथ हिंगे यांनी सांगितले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!