पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे लगत शिरगाव परिसरात हातभट्टी दारू निर्मितीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल १५ हजार लिटर रसायन जप्त केले आहे. या प्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ती सध्या फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १२ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.०५ वाजता गोल्डसाईन मीडिया होर्डिंगखालील मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार येथे बेकायदेशीररित्या हातभट्टी दारू तयार केली जात असल्याचे समोर आले.
त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकला असता, आरोपी मXXXX राठोड (वय २८, रा. शिरगाव, ता. मावळ) हिच्या ताब्यात मोठ्या प्रमाणात दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन साठवून ठेवलेले आढळले. पोलिसांनी अंदाजे ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महिला फरार आहे. तिचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.





Total Users : 213508