spot_img
spot_img
spot_img

शिफ्ट बदलाच्या वादातून हल्ला : सहकाऱ्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

खेड तालुक्यातील खराबवाडी येथील औद्योगिक परिसरात शिफ्ट बदलाच्या वादातून एका कामगारावर जीवघेणा हल्ला झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी उत्तर म्हाळुंगे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ११ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता वाघजाईनगर परिसरातील अॅडव्हॉन्स प्लास्टिक कंपनीत घडली. फिर्यादी रामानंद कुमार (वय ३३) हे कंपनीत शिफ्ट बदलत असताना कामाच्या कारणावरून त्यांचा सहकारी अजय कुमार निशांत (वय २४) याच्यासोबत वाद झाला.

वाद चिघळल्यानंतर आरोपी अजय कुमार याने संतापाच्या भरात मोल्डिंग मशीनजवळील लोखंडी रॉड उचलून रामानंद कुमार यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात रामानंद कुमार गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला आठ टाके पडले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कंपनीतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ११८(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महाडीक करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!