spot_img
spot_img
spot_img

रेड झोन जमीन व्यवहारांना अखेर दिलासा; नोंदणीस आता अडथळा नाही

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड परिसरातील रेड झोनमधील जमिनींच्या खरेदी-विक्रीवरील अडथळे अखेर दूर झाले असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नोंदणी महानिरीक्षकांनी स्पष्ट आदेश जारी करत केवळ रेड झोनचा आधार देत दस्त नोंदणी नाकारता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

लष्करी क्षेत्रालगत असलेल्या अनेक मालमत्तांवरील व्यवहार प्रलंबित राहिले होते. दुय्यम निबंधक कार्यालयांकडून नोंदणी टाळली जात असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर अॅड. एस. आर. गोयल यांनी सातत्याने पाठपुरावा करत प्रशासनाकडे निवेदने सादर केली होती.

या प्रयत्नांना यश येत ९ एप्रिल २०२६ रोजी नवीन परिपत्रक जारी करण्यात आले. त्यानुसार रेड झोनमध्ये बांधकामावर काही निर्बंध असले तरी खरेदी-विक्रीवर कोणतीही बंदी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे रखडलेले व्यवहार मार्गी लागणार असून, निबंधक कार्यालयांतील मनमानीवरही नियंत्रण येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पिंपरी-चिंचवडमधील मालमत्ता व्यवहारांना यामुळे नवी चालना मिळणार आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!