spot_img
spot_img
spot_img

दारूच्या नशेत पत्नीवर जीवघेणा हल्ला; तळेगावात पतीविरुद्ध गुन्हा

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

पिंपरी चिंचवड : तळेगाव दाभाडे येथील मंत्रा सिटी परिसरात दारूच्या नशेत पतीने पत्नीवर निर्घृण मारहाण करत डोक्यात गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहे.

महाराष्ट्र पोलीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मंत्रा सिटी, तळेगाव दाभाडे येथे ही घटना घडली.

महिला फिर्यादी घरी असताना तिचे पती संजय हिरामण पाटील (वय ५०) हे दारूच्या नशेत घरी आले. कोणतेही ठोस कारण नसताना त्यांनी पत्नीला शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण सुरू केली.

फिर्यादीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने किचनमधील सांडशी उचलून तिच्या डोक्यात जोरदार वार केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिला वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०८/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम ११८(१), ११५(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस हवालदार ओव्हाळ पुढील तपास करत असून आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, कौटुंबिक हिंसाचाराच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!