spot_img
spot_img
spot_img

प्रेमसंबंधात अडथळा ठरल्याने ६ वर्षीय चिमुकल्याचा निर्घृण खून; आईसह प्रियकराचा कट उघड

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

पिंपरी चिंचवड : मानवी नात्यांना काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली असून, प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून आईनेच आपल्या ६ वर्षीय मुलाचा प्रियकराच्या मदतीने निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना खेड तालुक्यातील कुरुळी येथे घडली असून संपूर्ण परिसरात संताप व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र पोलीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ४ एप्रिल २०२६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास कुरुळी (ता. खेड, जि. पुणे) येथे आरोपी महिला बसरीन मेहबुब शेख (वय २७) हिने तिचा प्रियकर राम विनायक कजेवाड यांच्या संगनमताने स्वतःच्या मुलाचा खून केला.

मृत मुलगा आवेज मेहबुब शेख (वय ६) हा आरोपींच्या प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याचे कारण पुढे आले आहे. आरोपींनी बाथरूममध्ये पाण्याच्या बादलीत मुलाचे डोके बुडवून ठेवत तसेच भिंतीवर आणि जमिनीवर डोके आपटत त्याचा जीव घेतल्याचा आरोप आहे.

घटनेनंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत मृतदेह Maruti Suzuki Ertiga कारमधून बीड जिल्ह्यातील धर्मापुरी येथे नेला. तेथे मुलाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव करण्यात आला.

मात्र, मुलाचे आजोबा इसाक महमद शेख (वय ४९, रा. पुस, ता. अंबाजोगाई, जि. बीड) यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. परळी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे माहिती दिल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपी महिलेकडून गुन्ह्याची कबुली मिळाली.

या प्रकरणी दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७१/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम १०३(१), २३८, ६१(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक जायभाये हे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, मुख्य आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे तर तिचा प्रियकर फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

या अमानुष घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आरोपींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!