पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
पिंपरी चिंचवड : दिघी परिसरात सार्वजनिक ठिकाणी अनैतिक कृत्य करत नागरिकांना त्रास देणाऱ्या महिलेविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र पोलीस यांच्या माहितीनुसार, दि. ८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५.२० वाजण्याच्या सुमारास योगीराज चौक ते चाकण चौक दरम्यान, श्री गुरु देहुकर महाराज फड (श्री क्षेत्र आळंदी) येथील लोखंडी कमानीजवळील फुटपाथवर ही घटना घडली.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनिल शिरसाट यांच्या फिर्यादीवरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६३/२०२६ नोंद करण्यात आला आहे.
तपासात समोर आले की, महिला आरोपीने वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना शब्दांनी, डोळ्यांच्या खुणांनी व हातवाऱ्यांद्वारे अश्लील हावभाव करून अडथळा निर्माण केला. या प्रकारामुळे सार्वजनिक शिष्टाचार व सभ्यतेचा भंग झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी Immoral Traffic (Prevention) Act 1956 अंतर्गत कलम ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महिला फरार आहे.
पोलीस उपनिरीक्षक जगताप पुढील तपास करत असून, अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष मोहीम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.




