spot_img
spot_img
spot_img

पुणे पोलीस दलात खळबळ! ‘पॉक्सो’चा धाक दाखवून प्राचार्याकडून ७ लाखांची खंडणी; PSIसह तिघांवर गुन्हा

प्रतिनिधी युनूस खतीब पिंपरी-चिंचवड

पुणे : पुणे पोलीस दलाला हादरवणारी गंभीर घटना समोर आली असून, पोलिसांकडूनच ब्लॅकमेलिंग करून खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. एका शाळेच्या महिला प्राचार्यांना ‘पॉक्सो’ कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवत तब्बल ७ लाख रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, कर्मचारी सुदाम तायडे आणि दामिनी पथकातील कर्मचारी सोनाली हिंगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित गुन्हा बंडगार्डन पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला असून, प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी प्राचार्य महिलेला ‘पॉक्सो’ अंतर्गत अटक करण्याची धमकी देत मानसिक दबाव निर्माण केला आणि त्यातूनच मोठी रक्कम उकळली. विशेष म्हणजे, आरोपींमध्ये कार्यरत पोलीस अधिकारी आणि दामिनी पथकातील कर्मचाऱ्याचा समावेश असल्याने प्रकरण अधिक संवेदनशील बनले आहे.

सध्या अजित बडे हे सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत असून, सोनाली हिंगे व सुदाम तायडे हे शिवाजीनगर पोलीस ठाण्याशी संबंधित आहेत. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, अधिक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!