शबनम न्यूज | प्रतिनिधी
चिंचवड विधानसभा मतदारसंघात आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांची मालिका राबवण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि स्वच्छतेला प्राधान्य देणारा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
शंकरभाऊ जगताप मित्र परिवाराच्या वतीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि सन्मानपूर्वक माध्यान्ह भोजन मिळावे, या उद्देशाने भोजनासाठी प्लेट्सचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे लहान विद्यार्थ्यांना स्वच्छतेची सवय लागण्यासोबतच त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जात आहे.
रहाटणी प्रभागातील महानगरपालिका शाळेत झालेल्या या कार्यक्रमात नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, नगरसेवक तानाजी बारणे, नगरसेविका मनिषा पवार, संदीप गाडे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात स्वच्छता आणि आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरत असून, आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड देणारा उपक्रम म्हणून त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.




Total Users : 239658