spot_img
spot_img
spot_img

पिंपरीत चहाच्या टपरीवर डिलीव्हरी कामावरून वाद; तरुणावर हल्ला, नाक फ्रॅक्चर

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

पिंपरीतील संत तुकारामनगर परिसरात चहाच्या टपरीवर झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनेत फिर्यादीचे नाक फ्रॅक्चर झाले असून एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल राजू वग्गे (वय १९, रा. गांधीनगर, पिंपरी) हे नेप्टो अॅपवर डिलीव्हरी पार्टनर म्हणून काम करतात. ४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सहाच्या सुमारास ते व त्यांचा मित्र रेहान शेख हे डी. वाय. पाटील हॉस्पिटलसमोरील वैजिनाथ टी स्टॉल येथे चहा पिण्यासाठी गेले होते.

यावेळी आरोपी सुहान तांबोळी (वय अंदाजे १९, रा. वल्लभनगर) हा त्यांच्याकडे डिलीव्हरी बॉयचे काम मागण्यासाठी आला. मात्र, रेहान शेख यांनी त्याला हे काम करू नको असा सल्ला दिल्याने आरोपीच्या मनात राग निर्माण झाला.

यानंतर काही वेळातच आरोपी सुहान तांबोळी व त्याचा साथीदार (नाव अज्ञात) पुन्हा तेथे आले. त्यांनी रेहान शेख यांना धक्का देत खाली पाडले व शिवीगाळ सुरू केली. मित्राला उचलण्यासाठी गेलेल्या फिर्यादी कुणाल वग्गे यांच्यावर आरोपींनी हल्ला चढवला.

या मारहाणीत आरोपी सुहान तांबोळी याने कुणाल यांच्या नाकावर जोरदार ठोसा मारून त्यांचे नाक फ्रॅक्चर केले. तर दुसऱ्या आरोपीने डोळा व ओठावर मारहाण करत दात पाडण्यास कारणीभूत ठरला.

या प्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११७(२), ३५२, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सुहान तांबोळी याला अटक करण्यात आली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मुंढे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!