spot_img
spot_img
spot_img

वाहन वादातून चालकावर लोखंडी पाईपने हल्ला; भोसरीत आरोपी अटकेत

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

इंद्रायणी नगर, भोसरी येथे वाहन चालवण्याच्या किरकोळ वादातून एका चालकावर लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे १०.४५ वाजण्याच्या सुमारास फरमाईश हॉटेलसमोर ही घटना घडली. याप्रकरणी चालक बबलू इस्माईल शेख (वय ४१) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी हे त्यांची छोटा हत्ती (MH-14 GD 8059) गाडी घेऊन जात असताना आरोपी रितेशकुमार संतोष राम (वय २२) हा दुचाकीवरून भरधाव वेगाने समोर आला. यावेळी फिर्यादी यांनी त्याला सावधगिरीने वाहन चालवण्याबाबत सांगितल्याने आरोपी संतापला.

यानंतर आरोपीने दुचाकी थांबवून फिर्यादीशी वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या गाडीतूनच लोखंडी पाईप काढून त्यांच्या डोक्यावर जोरदार वार केले. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाला.

घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१) व ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार शेलार करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!