spot_img
spot_img
spot_img

थेरगावात अनधिकृत भराव प्रकरण; नाला बुजवल्याने पर्यावरण धोक्यात, दोघांवर गुन्हा

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

थेरगाव परिसरात अनधिकृतपणे मोकळ्या जागेत भराव टाकून नाला अरुंद केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासह पर्यावरणावर धोका निर्माण झाल्याने काळेवाडी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र आरोपी अद्याप अटकेत नाहीत.

ही घटना जगताप नगर, थेरगाव येथील सर्व्हे नं. ४/१२ मधील मोकळ्या जागेत जून २०२५ पासून सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे. याबाबत दि. १ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६:४१ वाजता गुन्हा नोंदविण्यात आला.

या प्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे उपअभियंता पंकज सुधाकर धेडे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपींना अनधिकृत भराव काम थांबविण्याबाबत महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी भराव सुरूच ठेवला. परिणामी, त्या ठिकाणी असलेला नैसर्गिक नाला मातीने भरला जाऊन अरुंद झाला आहे.

या प्रकारामुळे पाणी निचरा बाधित होण्याचा धोका निर्माण झाला असून, परिसरात आरोग्याच्या समस्या तसेच पर्यावरणीय हानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणी शुभम ओव्हाळ आणि सारिका जगताप (दोघेही रा. थेरगाव) यांच्यावर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९९४, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ तसेच भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!