spot_img
spot_img
spot_img

आळंदीत बांधकामावरील निष्काळजीपणाचा बळी; मजुराचा मृत्यू, ठेकेदारावर गुन्हा

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

आळंदीतील भाजी मार्केट परिसरात सुरू असलेल्या बांधकामावर सुरक्षेच्या उपाययोजना न केल्यामुळे एका तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आळंदी पोलिसांनी ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल केला असून, आरोपी अद्याप फरार आहे.

ही घटना दि. २२ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास आळंदी भाजी मार्केट परिसरातील सर्व्हे क्र. १अ/२३ येथे घडली. याबाबतचा गुन्हा दि. १ एप्रिल रोजी रात्री ९:५२ वाजता आळंदी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.

मृत मजुराचे नाव सुभाष प्रल्हाद हारीमकर (वय २७) असे असून, तो संबंधित बांधकामावर काम करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या पहिल्या मजल्यावर काम सुरू असताना ठेकेदाराने आवश्यक सुरक्षाव्यवस्था न केल्यामुळे हा अपघात घडला.

तपासात उघड झाले की, कामाच्या ठिकाणी संरक्षण जाळी लावण्यात आलेली नव्हती, तसेच मजुरांना हेल्मेट व सेफ्टी हर्नेससारखी सुरक्षासाधने देण्यात आली नव्हती. यामुळे काम करत असताना सुभाष हारीमकर हे खाली कोसळले व त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान दि. २९ मार्च रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी ठेकेदार वैभव कस्पटे (रा. आळंदी) याच्यावर बीएनएस कलम १०६ (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपी अद्याप अटकेत नसून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

या घटनेमुळे बांधकाम क्षेत्रातील सुरक्षेच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, संबंधित यंत्रणांनी कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!