spot_img
spot_img
spot_img

बावधनमध्ये सार्वजनिक ठिकाणी अनैतिक कृत्य; महिला विरोधात गुन्हा

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

बावधन परिसरात सार्वजनिक ठिकाणी अनैतिक कृत्य करून नागरिकांना त्रास देणाऱ्या महिलेविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. ३१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.४० वाजण्याच्या सुमारास बावधन, बेंगलोर–मुंबई हायवे सर्व्हिस रोडवरील ग्रीन पार्क लॉजजवळ ही घटना घडली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने गस्तीदरम्यान संबंधित महिला सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना इशारे करून व अश्लील हावभाव करत असल्याचे आढळून आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, सदर महिला वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने लोकांना आकर्षित करत होती. तिच्या या कृत्यामुळे सार्वजनिक शिस्त व सभ्यतेचा भंग होत असल्याने तत्काळ कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी संबंधित महिलेविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम (PITA) कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला नोटीस बजावण्यात आली आहे.

सदर कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस हवालदार उदयकुमार भोसले यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!