पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी : युनूस खतीब)
मावळ तालुक्यातील उर्से परिसरात अंमली पदार्थांवर कारवाई करत शिरगाव परंदवडी पोलिसांनी गांजासह एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३० मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.३० वाजता उर्से ते वारीवणा रोडलगत वर्षभो पानटपरीच्या मागील बाजूस ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी रात्री ९.५१ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस हवालदार सचिन बबनराव काचोळे (वय ३६) यांनी फिर्याद दिली आहे.
तपासात आरोपी गणेश खंड मुळक (वय ३६, रा. उर्से , ता. मावळ) याच्या ताब्यातून ६,००० किमतीचा गांजा (कॅनाबिस वनस्पतीची पाने, फुले, बिया व बोडे यांचा समावेश असलेला हिरवट तपकिरी ओलसर सुटटा पदार्थ) जप्त करण्यात आला. तसेच त्याच्याकडून ५,००० किमतीचा OPPO कंपनीचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आला असून एकूण ₹११,००० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क), २०(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पारखे करत आहेत.



