spot_img
spot_img
spot_img

परीक्षा देऊन बाहेर पडताच विद्यार्थ्यावर हल्ला; हिंजवडीत तिघांविरुद्ध गुन्हा

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी : युनूस खतीब) 

परीक्षा देऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यावर जुन्या वादाच्या कारणावरून मारहाण केल्याची धक्कादायक घटना हिंजवडी परिसरात घडली असून, या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३० मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.०० वाजता वाकड येथील इंदिरा कॉलेज युनिटी कॅम्पस (शनी मंदिर रोड) येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी रात्री ९.५५ वाजता हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

या प्रकरणी ओमकार मंगेश पाटील (वय २१, रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी हे हिंदी विषयाचा पेपर देऊन बाहेर येत असताना आरोपींनी त्यांना अडवले. सुमारे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या एका भांडणाचा राग मनात ठेवून आरोपींनी “तू आमच्याकडे खुन्नसने का बघतोस?” असा जाब विचारत वाद घातला.

यानंतर आरोपी प्रथमेश नडे याने फिर्यादीला हाताने मारहाण केली, ज्यामध्ये त्याच्या हातातील अंगठी फिर्यादीच्या नाकाला लागून दुखापत झाली. त्यानंतर आरोपी अदिनाथ ढमाले याने जवळच असलेल्या लोखंडी खुर्चीने मारहाण केली. दरम्यान आरोपींनी “तुला सोडणार नाही” अशी धमकी देत शिवीगाळही केली.

या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले असून परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८ (१), ३५२, ३२४ (४), ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप अटकेत नसून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांदे करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!