spot_img
spot_img
spot_img

भांडण सोडवायला गेलेल्या व्यक्तीवर लोखंडी कड्याने हल्ला; देहूरोडमध्ये गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी : युनूस खतीब) 

सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवरच लोखंडी कड्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना देहूरोड परिसरात घडली असून, या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २९ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजता बी.जी. शिर्के लेबर कॅम्प, बापदेवनगर, विकासनगर, किवळे येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी दि. ३० मार्च २०२६ रोजी सकाळी ९.०४ वाजता देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

या प्रकरणी केशवकुमार विजय मिश्रा (वय ३४, रा. किवळे, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी हे त्यांचे मामे भाऊ मनोज पांडे आणि आनंदकुमार ओरकेरा यांच्यात सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेले असता, आरोपी विशाल जमदाडे (वय अंदाजे २५) याने अचानक आक्रमक होत शिवीगाळ करत “बघून घेण्याची” धमकी दिली.

यानंतर आरोपीने हातातील लोखंडी कड्याने फिर्यादीच्या डोक्यात, पाठीवर आणि डाव्या हाताच्या कोपराजवळ जबर मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला तीन टाके पडले आहेत. तसेच मनोज पांडे यांनाही पाठीवर मारहाण करण्यात आली.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ३५२, ३५१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शेख करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!