spot_img
spot_img
spot_img

भरधाव दुचाकीची धडक; चाकणमध्ये तरुण जखमी, मित्राचा खांदा फ्रॅक्चर

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

चाकण परिसरात भरधाव आणि निष्काळजीपणे दुचाकी चालवल्यामुळे झालेल्या अपघातात दोन तरुण जखमी झाले असून त्यापैकी एकाचा खांदा फ्रॅक्चर झाला आहे. या प्रकरणी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवार (दि. २१ मार्च २०२६) रोजी रात्री सुमारे ९.४० वाजण्याच्या सुमारास चाकणहून भाम-वाकी मार्गावर, ता. खेड, जि. पुणे येथे घडली. याबाबत शिवम अरविंद साबळे (वय १९, रा. चाकण) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी आणि त्यांचा मित्र निशांत काळे हे अ‍ॅक्टिवा (क्र. MH 14 KG 0273) या दुचाकीवरून प्रवास करत असताना, त्यांच्या दुचाकीच्या पाठीमागून आरोपी हनुमंत पिराजी मोकले हा त्याच्या ताब्यातील फॅशन प्रो (क्र. MH 14 BP 1462) ही दुचाकी भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालवत येऊन जोरदार धडक दिली.

या अपघातात फिर्यादी आणि त्यांचा मित्र दुचाकीसह खाली पडले. शिवम साबळे यांच्या कपाळ व नाकाला किरकोळ दुखापत झाली, तर निशांत काळे याच्या उजव्या खांद्याला गंभीर दुखापत होऊन खांदा फ्रॅक्चर झाला आहे. तसेच अ‍ॅक्टिवा दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस अधिकारी गाढवे करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!